Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तिन दिवशीय व्यायाम शिबीर संपन्न

चंद्रपुर : दिनांक 19, 20, 21 मे 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा माध्यमातून व यशोधरा महिला मंडळ घुग्घुसचा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार मागील खाली प्रांगणात घुग्घुस येथे तिन दिवशीय व्यायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे आयोजक ESK HEALTH STUDIO चंद्रपूर यांच्या द्वारे करण्यात आला होता. पहिल्या दिवशी ध्यान साधना डॉ. कल्पना बनसोड यांच्या मार्गदर्शनात केले. ध्यान साधना करतांनी बनसोड यांनी एकाग्रता कशी करायची त्याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर व्यायाम शिबीर हे तिन दिवशीय निशुल्क घेण्यात आले. तिसर्‍या दिवशी सर्वांना आरोग्य विषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, चंद्रगुप्त घागरगुंडे, कोषाध्यक्ष वैशाली निखाडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर, बबन वाघमारे, राहुल बुरड, ESK HEALTH STUDIO चंद्रपूर डॉ. कल्पना बनसोड, रंजीता फुलझेले, प्रज्वला देवगडे आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News