श्री महर्षी विद्या मंदिर ची कु.अदिती शर्मा कॉमर्स शाखेत प्रथम श्री महर्षी विद्या मंदिर चा ओम बन्हटकर सायन्स शाखेत द्वितीय क्रमांकावर
चंद्रपुर : श्री महर्षि विद्या मंदिर ने या वर्षी सुद्धा CBSE बोर्ड परीक्षेत टॉपर ची परंपरा कायम ठेवली आहे. श्रीमहर्षि विद्या मंदिरचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग गुणांसह उत्तीर्ण होतात. CBSE XII बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेमधून ओम वऱ्हाटकर (93.4%) टक्के घेऊन द्वितीय क्रमांकावर आला आहे. तसेच यश जैस्वाल (92.8%) आणि गितेश बघेल याला (91.2%) टक्के गुण मिळाले आहेत.
यावर्षी (2023-24) विज्ञान शाखेमध्ये 109 विद्यार्थी तसेच वाणिज्य शाखेमध्ये 32 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तसेच कॉमर्स शाखेमधून कु.अदिती शर्मा (94.4%) घेऊन प्रथम आली आली आहे. सोबत कु.पुष्पांकी गोंडे हिला (93.8%), कु.नुरेन शय्येद हिला (92.6%), आणि कु.शुद्धी रामटेके हिला (90.6) मार्क्स मिळाले आहेत.
ओम व हटकर ला इंग्रजी मध्ये 99 मार्क्स, फिजिकल एजुकेशन मध्ये 96 मार्क्स बायलॉजि मध्ये 95 मृणाल मार्क्स, यश जैस्वाल ला फिजिकल एजुकेशन मध्ये 96 मार्क्स आणि बायलॉजि मध्ये 95 मार्क्स, गोरकार ला फिजिक्स मध्ये ९२ मार्क्स तसेच केमिस्त्री मध्ये 98 मार्क्स मिळाले आहेत. अदिती शर्मा ला बिझनेस बिझनेस स्टडीज मध्ये 99 मार्क्स आणि अकाउंट्स मध्ये 94 मार्क्स, शुद्धी रामटेके ला इकॉनोमिक्समध्ये 96 मार्क्स मिळाले आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.
विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेचा गौरव केला. अध्यक्ष गिरीश चांडक , उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, कोषाध्यक्ष अनुपम चिलके , सदस्य अलका चांडक, उमेश चांडक आणि वीरेंद्र जैस्वाल तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपमुख्याध्यापिका निशा मेहता यांनी विद्यार्थ्याचे व त्यांच्या पालकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.