महाराष्ट्र : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदारसंघातील २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत. या मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार तर, १६ हजार ५८९ मतदान केंद्र असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिसऱ्या टप्प्यात कोकण विभाग- २, पुणे- ७ व औेरंगाबाद- २ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान होणार असून १२ ते १९ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्र छाननी २० एप्रिल तर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.