Wednesday, July 9, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल

चंद्रपूर : दि. 5 मे व 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता राष्ट्रीय लोक अदालत ही 27 जुलै व 28 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. हा बदल राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 5 मे 2024 आणि 14 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 5 मे 2024 रोजी होणारी लोकअदालतच्या तारखेत बदल होऊन दिनांक 27 जुलै 2024 रोजी आणि दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी होणारी लोकअदालत 28 सप्टेंबर 2024 रोजी ठेवण्यात आलेली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस.एस.भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात असून यात विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी व ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वतः येऊन किंवा हेल्पलाईन फोन नंबर 07172-271679 कार्यालयीन मोबाईल क्रमांक 8591903934 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News