चंद्रपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युवकांचे प्रेरणास्थान कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार हे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भद्रावती येथे आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) शहरअध्यक्ष पदी शरद राजेश कुमार यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पीट्टलवार, युवक कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद राजेश कुमार यांच्या नियुक्तीने घुग्घुस शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.