परभणी : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देत शहीद झालेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना शहीद दिननिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी-कमचारी यांची उपस्थिती होती.