Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शाळा दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा  

मनपा शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका पीएम श्री सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा येथे ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शाळा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी मुरूगानंथम एम, मनपा उपायुक्त मंगेश खवले, मुख्यलेखाधिकारी मनोहर, बागडे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित तसेच शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या लेझिम पथकाद्वारे करण्यात आले. यावेळी शाळेचे स्नेहसंमेलन कार्यक्रम सुद्धा आयोजीत करण्यात येऊन विद्यार्थी व पालकांच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी, निबंध, वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांच्या स्पर्धेत विजयी महिला पालकांना सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस देऊन महिला पालकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेले काही सादरीकरण पाहून सहाय्यक जिल्हाधिकारी व उपायुक्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी नर्सरी ते वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांनी विविध नाटिका, समूह नृत्य इत्यादींचे उत्तम सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा सहभाग लाभला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News