घुग्घुस : प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पी.एम.स्वनिधी योजना) अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेमार्फत, दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोनच महिन्यात २८ पथविक्रेत्यांनी घेतला आहे.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने नगरपरिषदेकडुन विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. शहरातील राष्ट्रीयकृत बँक या पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करतात व विहीत मुदतीत अर्ज निकाली काढुन प्रकरणे मंजुर करण्याची प्रक्रिया करतात.
घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असुन अधिक माहीतीसाठी नगरपरिषद कार्यालय, येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.