Tuesday, May 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जेसीबी द्वारे वर्धा नदी काठावर मुख्य रस्तयावर खडे करून रस्ता बंद करण्यात आले.

चंद्रपुर : तालुक्यातील पांढरकवडा वढा रेती घाटावर गेल्या अनेक महिन्यापासून रेती (वाळू) तस्करांनी धुमाकूळ घालुन शासनाच्या लाखो रुपयांचा चुना लावला या रेती तस्करीची बातमी मीडियात सतत उचलून धरल्याने शेवटी प्रशासनाला रेती चोरी थांबविण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तसेच तहसीलदार यांच्यातर्फे वर्धा नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर जेसीबी मशीन द्वारे खड्डे मारून घाटावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

वढा येथील वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांनी रात्रेच्या सुमारास गेल्या अनेक महिण्यापासून राजकीय बळावर रेती चोरी शुरु आहे. सदर तस्कर हे ट्रक्टरने वाळू चोरी करीत असतात वाळू माफियांनी पुर्णपणे वाळू घाट पोखरुन काढले या राजकीय बळावर वाळू चोरी या वढा घाटावर वाळू उत्खनन सुरु होते.

ट्रॅक्टर ट्रालीने बेधड़कपणे वाळू चोर धुमाकूळ करीत होते. शासनाला लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचा महसूलला फटका बसत होता. सदर तस्करांचे मनोबल मोठया प्रमाणात वाढले होते. शेवटी उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाने कारवाई केली आहे.

गुरुवार 09/11/2023 ल वढा येथे अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच सचिन ख़ंडाळे (नायब तहसीलदार) या़ंचे मार्गदर्शनाखाली जेसीबी द्वारे वर्धा नदी काठावर मुख्य रस्तयावर खडे करून रस्ता बंद करण्यात आले. सदर कार्यवाही मंडळ अधिकारी नवले, तलाठी पांढरकवडा नगराळे, कोतवाल वाघमारे यांनी केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News