घुग्घुस : प्रकल्पग्रस्त, शेतकरी, बेरोजगार, ओबीसींचे नेते राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा भारत सरकारचे माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस मध्ये विविध कार्यक्रम द्वारा मोठ्या उत्साहात घुग्घुस येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजप नेते संजय तिवारी, माजी सभापती निरीक्षण तांड्रा, माजी जिल्हा परिषद सदस्य चिंनाजी नलभोगा, माजी सरपंच संतोष नुने, साजण गोहने, मल्लेश बल्ला, अमोल थेरे, बेगम ताई, मूर्ती पेरकुल्ला उपस्थित होते.
दिवसभरात 123 रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. 36 लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड वाटप करण्यात आले. 53 जेष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आली. 46 शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 51 गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. 39 लाभार्थ्यांना शेगडी वाटप करण्यात आली. अनेक कामगार बांधवांना इ श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.




