रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता राजभवन, मुंबई येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने लोटे-परशुराम हेलिपॅड, ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता लोटे-परशुराम हेलिपॅड, ता.खेड, जि.रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने भूखंड क्र.ए-१, अतिरीक्त लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्र, ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भूमीपूजन समारंभ. (स्थळ : भूखंड क्र.ए-१, अतिरीक्त लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्र, ता.खेड, जि.रत्नागिरी) दुपारी 12 वाजता मोटारीने लोटे-परशुराम हेलिपॅड, ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता लोटे-परशुराम हेलिपॅड, ता.खेड, जि.रत्नागिरी येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने नुतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरीचा शुभारंभ समारंभ व नमो ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम. (स्थळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रांगण, रत्नागिरी.) दुपारी 2 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विमानाने चिपी विमानतळ, जि. सिंधुदूर्गकडे प्रयाण.