Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

प्रयास दांडिया उत्सव २०२३ अंतर्गत घुग्घुस येथे दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा थाटात संपन्न

महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घुग्घुस (चंद्रपूर) : प्रयास सभागृहात गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुस तर्फे प्रयास दांडिया उत्सव २०२३ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक प्रमुख राजुरा विधानसभा तथा माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख पाहुणे ठाणेदार आसिफराजा शेख, प्रमुख मार्गदर्शक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा तथा माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणेदार आसिफराजा शेख, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, अशोक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, अमोल थेरे, साजन गोहणे, कुसुम सातपुते, अमीना बेगम, वसंत भोंगळे, रेहान शेख, संजय भोंगळे, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रयास सखी मंच घुग्घुस तर्फे करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २५४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

युवती गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये.
महिला गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये.
प्रशिक्षणार्थी गट पुरस्कार प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह ३००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह २००१/- रुपये, तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह १००१/- रुपये व ११ प्रोत्साहनपर पारितोषिके बक्षीस ठेवण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रशिक्षक म्हणून रोशन आवळे, वैशाली झाडे, अविनाश मेश्राम, श्रीराम पचारे यांनी काम पहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्ष किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, वैशाली ढवस, सुचिता लुटे, लक्ष्मी नलभोगा, सारिका भोंगळे, सिमा पारखी, पूजा दुर्गम, सुषमा सावे, नंदा कांबळे, सुनीता पाटील, नाजमा कुरेशी, विना वडस्कर, निशा उरकुडे, पुष्पा रामटेके, विना घोरपडे, रुंदा कोंगरे, वंदना मुळेवार, वैष्णवी बोंबले, यांनी प्रयत्न केले.

यावेळी मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News