घुग्घुस (चंद्रपूर) : ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आयुष्यमान भव अभियाना अंतर्गतचे आतापर्यंत आयुष्यमान कार्ड हजारो लाभार्थ्यांचे मोफत काढून देण्यात आले आहे.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात हजारो लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यात येत असल्याने ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात नागरिकांची आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी रिघ लागली आहे.
या योजने अंतर्गत सर्व सरकारी रुग्णालये व पॅनलमध्ये सामील रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यावर उपचार केला जाईल. लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ लाख रुपया पर्यंत आरोग्य विमा उपलब्ध होणार आहे.
सर्व नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढावे असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.