Friday, November 7, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व 2284वा अशोका विजया दशमी कार्यक्रम साजरा करण्यात आला

घुग्घुस (चंद्रपुर) : दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचा वतीने आज पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस इथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व 2284 वा अशोका विजया दशमी दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

यावेळस सर्व बौद्ध बांधव हे सकाळी दहा वाजता पंचशील बौद्ध इथे एकत्रित येऊन रॅली काडुन नगर परिषद घुग्घुस येथे प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन नगर परिषद घुग्घुस येथे अभिवादन करण्यात आले.

त्या नंतर पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे वापसी करत पंचशील बौद्ध विहार येथे तथागत भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन सर्व बौद्ध बांधवांनी अभिवादन केले.

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांची प्रकृती ठिक नसल्या मुळे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव हे कार्यक्रमाला उपस्थित होऊ नाही शकले.

यावेळेस घुग्घुस येथील सर्व विहार, आम्रपाली बौद्ध विहार, रमाबाई बौद्ध मंडळ, महाप्रज्ञा बौद्ध विहार, जैतवन महाबोधी बौध्द विहार, सारिपुत्त बौध्द विहार, तक्षशिला जनजागृत महिला मंडळ, गौतम सिद्धार्थ बौद्ध विहार, यशोधरा महीला मंडळ, ही रॅली पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे एकत्रित येऊन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस, यशोधरा महीला मंडळ घुग्घुस ने लेझीम पथक चे आयोजन करित लेझीम पथक द्वारे ही रॅली गांधी चौक, बँक ऑफ़ इंडिया, ते तहसील कार्यालयात नवबौद्ध स्मारक समिती घुग्घुस डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने सायंकाळी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळेस भारतीय बौद्ध महसभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम महिला जिल्हाध्यक्षा सुजाता लाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस उपाध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, केंद्रीय शिक्षका मायाताई सांड्रावार, हेमंत आनंदराव पाझारे कोषाध्यक्ष विहार बांधकाम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर लहान मुलांचा भीम गीतांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सर्व कार्यक्रम शांत रित्या पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे संचालक भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे महासचिव रमाबाई सातारडे तर आभार प्रदर्शन यानी केले.

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे उपाध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्षा माया सांड्रावार, महासचिव रमाबाई सातारडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस कोषाध्यक्ष वैशाली निखाडे, संभाजी पाटील, दिगांबर बुरड, जनार्दन जिवने, लक्ष्मण टिपले, नामदेव फुलकर, समता सैनिक दल, सोहम पाटील, बौद्ध स्मशान भुमी देखरेख समिती चे अध्यक्ष धिरज पाटील यशोधरा महीला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, प्रतिभा कांबळे, स्मिता कांबळे, उर्मिला लिहितकर, नर्मदा खोब्रागडे, जयंत निखाडे व सर्व घुग्घुस येथील बौद्ध बांधव उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News