पंडितजी अखंड भारताच्या संकल्पनेचे जनक – विवेक बोढे
घुग्घुस : ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, पं.दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व थोर विचारवंत होते त्यांनी अखंड भारताची संकल्पना केली होती त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो.
यावेळी रामस्वामी पुनम, नितीन आमटे, मदन जंगम, सुनंदा आमटे, रेणुका सोळंके, सुषमा बोबडे, विशाखा पाटील, खुर्शीदा सिद्दीकी, ललिता पाटील, रंजना कमटकर, गोसाई चौधरी, विनोद जुनघरी, वसंत सोळंके, सुभाष गोखरे, किशोर गोहणे, विमल चौधरी, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे व नागरिक उपस्थित होते.




