चंद्रपुर : चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कुल, नगीनाबाग सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकजवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक, डी. एड. कॉलेज ग्राउंड बाबुपेठ, महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपुर ही ठिकाणे दि. 28 सप्टेंबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबरचे सकाळी 6 वाजेपर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोषीत करण्यात येत आहेत. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या पार्किंग स्थळी पार्क करावीत. जनतेने विसर्जनादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
चंद्रपूर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




