चंद्रपुर : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळ्यादरम्यान “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ करण्यात आले आहे.
यामध्ये, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलपर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड़ देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक पर्यंत, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज, पोटदुखे यांच्या घरापासुन ते श्री टॉकीज पर्यंत, हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीजपर्यंत, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीरपर्यंत “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आल्याने मिरवणुक व वाहतुक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करू नये.
मुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहीवाशांना स्वतःच्या पार्कीगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने जुबली हायस्कुलचे पटांगण, महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येतील. परंतु मिरवणुक संपल्यानंतरच ती वाहने तेथुन काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांना पार्किंग झोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.