रत्नागिरी : सन 2023-24 या वित्तीय वर्षामध्ये जि.प. रत्नागिरीने स्वउत्पीन्नातून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवलेल्या 5 टक्के निधीतून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तीसाठी विनाअट घरकुल देणे, दिव्यांग- दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे, दिव्यांग व्यक्तींना समुपदेश तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांना सहाय्यक अनुदान देणे या वैयक्तिक व सामुहीक लाभांच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय (सर्व) तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी/ त्यांचे पालकांनी तसेच समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांनी कार्यालयाकडून अर्ज नमुना प्राप्त करुन घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव आपले गाव ज्या पंचायत समिती कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहे त्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तात्काळ सादर करावेत.