Sunday, June 28, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वियानी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय या शाळे जवळ ट्रॅफिक पोलिस रुजू करा : शरद पाईकराव

घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी घुग्घुस च्या माध्यमातून कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य, सोमजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हा महासचिव, धर्मेंद्र शेंडे साहेब VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष .शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वामध्ये पोलिस निरीक्षक पो. स्टे. घुग्घुस यांना वियानी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय या शाळे जवळ ट्रॅफिक पोलिस रुजू करा असा एक निवेदन दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आले.

वियाणी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुग्घुस हे घुग्घुस चंद्रपूर हायवे वर असल्यामुळे शाळेत लहान लहान मुल व त्यांचे पालक रोज मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी व आणण्यासाठी ये – जा करतात. घुग्घुस ते चंद्रपूर हायवे असल्यामुळे या ठिकाणी रोडणे खुप मोठ्या प्रमाणात जडवाहतुक सुध्दा ये-जा करतात. या रोडवर खुप मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा झालेले आहे भविष्यात हे अपघात होऊ नये म्हणून सकाळी 7 ते 8 दुपारी 1 ते 3 व सायंकाळी 5 ते 6 वाजेतपर्यंत ट्रॅफिक पोलीस रुजू करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस कडुन करण्यात आली.

निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस येथील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News