घुग्घुस (चंद्रपुर) : घुग्घुस वस्तीच्या तलावाचे वेकोलितर्फे खोलीकरण करणे आणि बँक ऑफ इंडिया जवळ वेकोलितर्फे नवीन लोखंडी पुलाचे निर्माण करणे अशा मागणीचे एक निवेदन दिले. आणी विविध समस्या सोडविण्यासाठी मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी तडाली वेकोलिच्या क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांच्यासोबत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची बैठक पार पडली.
घुग्घुस वस्तीच्या तलावात ढिवर भोई समाज बांधव मासेमारी अनेक वर्षापासून करीत आहे. परंतु या तलावात मोठया प्रमाणात गाळ तयार झाला आहे त्यामुळे ढिवर भोई समाज बांधवांनी मासेपालन करणे सोडले त्यामुळे ढिवर भोई समाज बांधव आर्थिक संकटात सापडले आहे.
बँक ऑफ इंडिया जवळचा वेकोलिचा लोखंडी पुल हा जीर्ण अवस्थेत आहे. या लोखंडी पुलावरून वेकोलि वसाहतीचे आणि घुग्घुस वस्तीचे नागरिक दुचाकीने ये-जा करतात त्यामुळे याठिकाणी नवीन लोखंडी पुल बनविणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांची भेट घेतली व वेकोलि वसाहतीच्या समस्यांचे निराकरण करणे, वणी रस्ता ते लोखंडी पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे शहरातील अशा विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच घुग्घुस वस्तीच्या तलावाचे वेकोलितर्फे खोलीकरण करणे आणि बँक ऑफ इंडिया जवळ वेकोलितर्फे नवीन लोखंडी पुलाचे निर्माण करणे अशा मागणीचे निवेदन दिले.
याप्रसंगी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यामान्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी घूग्गुस शहराचे माजी सरपंच संतोष नुने, भोई संघटनेचे अध्यक्ष अमोल नागतुरे, गणेश कुटेमाटे, विशाल नागपुरे, शंकर कामतवार, विजय कामतवार, मंगेश कामतवार, प्रमेश कामतवार, शंकर कामतवार, नागेश नागतुरे, आदी उपस्थित होते.