Thursday, July 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्वच्छ रस्ते… सुंदर शहर! अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छतेसाठी सातत्यपूर्ण अभियान

अहिल्यानगर : स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराच्या दिशेने अहिल्यानगर महानगरपालिकेने आपले विशेष स्वच्छता अभियान सातत्याने सुरू ठेवले आहे. गुरुवार (दि. २ जुलै) रोजी नगर–मनमाड महामार्गावरील हिरा पॅलेस ते सन फार्मा चौक या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान दुभाजकाजवळ साचलेली माती, रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा, दुभाजकातील हरित कचरा तसेच प्लास्टिक कचरा हटवून परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. याशिवाय, काही ठिकाणी निर्माण झालेले अनधिकृत कचराकुंडीचे स्पॉटही हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

महानगरपालिकेच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होत असून नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, “स्वच्छ रस्ते… सुंदर शहर” हा संकल्प साकार करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News