चंद्रपूर : दि. १९ जून २०२६ रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा शिवसेना, चंद्रपूरच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मसालेभात वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष युवराज धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार हा उपक्रम ललित कासट यांच्या नेतृत्वात उत्साहात पार पडला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मसालेभाताचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशांत रोहनकर, बबलू मेश्राम, गजानन राऊत, कुमार जुल्मुलवार, चंदन पॉल, संतोष सोनकर, कुलदीपसिंग मिर्दा, शनिश महातो, प्रभाकर धांडे, शंकरजी वांडरे, अनुज सोनी, शिनू आर्टोले, मिलिंद गंपावार, अंकित योगी, महेश डोंगे (शहर प्रमुख, घुग्घूस) यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नाचे वाटप करून शिवसेनेची समाजसेवेची परंपरा कायम राखली. भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




