Wednesday, May 20, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कंबाईन्ड डिफेंस सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्याकरीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 15 जुन ते 28 ऑगष्ट 2026 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक.11 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६६) कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट पूर्ण भरून सोबत आणावे.

पात्रता :
1) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 2) उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परीक्षेकरीता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्र.9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News