चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागासाठी निवडायची सभासद संख्या निश्चित करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात एकूण 56 निवडणूक विभाग व 112 निर्वाचक गण रचना निश्चित करण्यात आली आहे.
निश्चित केलेल्या विभाग व गण रचनेचे अंतिम परिशिष्ट 8 (अ) व 8 (ब) मधील अधिसूचना व अनुसूची शासन राजपत्रात 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलक आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता निश्चित सदस्य संख्या पुढीलप्रमाणे –
चिमूर : जि.प. – 5, पं.स. – 10
नागभीड : जि.प. – 4, पं.स. – 8
ब्रम्हपुरी : जि.प. – 5, पं.स. – 10
सिंदेवाही : जि.प. – 4, पं.स. – 8
भद्रावती : जि.प. – 4, पं.स. – 8
वरोरा : जि.प. – 5, पं.स. – 10
चंद्रपूर : जि.प. – 5, पं.स. – 10
मुल : जि.प. – 3, पं.स. – 6
सावली : जि.प. – 4, पं.स. – 8
पोंभुर्णा : जि.प. – 2, पं.स. – 4
गोंडपिपरी : जि.प. – 3, पं.स. – 6
बल्लारपूर : जि.प. – 2, पं.स. – 4
कोरपना : जि.प. – 4, पं.स. – 8
जीवती : जि.प. – 2, पं.स. – 4
राजुरा : जि.प. – 4, पं.स. – 8
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी निश्चित झालेल्या या रचनेनुसार निवडणुकीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.





