— प्रणयकुमार बंडी
घुग्घूस/चंद्रपुर : पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी इच्छुक पदवीधरांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन घुग्घूस नगर परिषदचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांनी केले आहे. आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज (फॉर्म) सादर करण्याची अंतिम तारीख 26 सितंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाची सूचना देताना सांगितले की, पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत अद्याप नावाची नोंदणी झालेली नसलेल्या पात्र पदवीधरांनी विलंब न करता संबंधित फॉर्म भरून सादर करावा. 26 सितंबर ही नोंदणीसाठी अंतिम तारीख असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेत पात्र मतदार म्हणून सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र पदवीधर नागरिकांनी आपली नोंदणी झाली आहे किंवा नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आयोगाच्या आदेशानुसार 26 सितंबर 2026 ही अंतिम मुदत असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र पदवीधर मतदारांनी या संधीचा लाभ घेत आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म वेळेत सादर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांनी केले आहे.
दरम्यान, अंतिम मुदत जवळ आल्याने संबंधित पात्र पदवीधरांनी कोणताही विलंब न करता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. नगर परिषद प्रशासनाकडूनही नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




