Saturday, April 25, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आदिवासी भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत — अंतिम दिनांक 4 जुलै 2025

चंद्रपूर : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ व ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी 2023-24 व 2024-25 या दोन वर्षांकरिता पात्र व्यक्ती आणि संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही व पोंभुर्णा या तालुक्यांतील आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 जुलै 2025 असून, इच्छुकांनी आपले प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.

या पुरस्कारांद्वारे आदिवासी समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News