Sunday, April 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जागतिक योगदिन उत्साहात साजरा

घुग्घुस (चंद्रपूर) : भाजपा व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ११ वा जागतिक योगदिन शनिवार, २१ जून रोजी सकाळी ‘प्रयास’ सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला असून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात आयोजन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले, “योग हा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तणावावर मात करण्यासाठी दररोज योग करणे आवश्यक आहे. योगामुळे मानसिक स्थैर्य मिळते आणि मनात सकारात्मक विचार निर्माण होतो.”

योग शिक्षक अनिल नित यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाभ्यास घडवून आणला.

कार्यक्रमाला विवेक बोढे, अनिल नित, ज्येष्ठ समाजसेवक अनिल दागमवार, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, चिन्नाजी नलभोगा, कुसुम सातपुते, हेमंत पाझारे, अनघा नित, सुरेंद्र जोगी, बबनराव बोढे, विना बांगडे, विना घोरपडे, डॉ. वऱ्हाटे, मुस्तफा शेख, वंदना मुळेवार, सुशील डांगे, सिनू कोत्तूर, मॉर्निंग ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप, महिला पतंजली योग समिती, प्रयास योग समिती व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News