Sunday, May 24, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

काँग्रेसच्या मागणीला यश! महावितरणने रात्रपाळीत कर्मचारी नियुक्त करून हेल्पलाईन नंबर केला प्रसिद्ध

घुग्घुस (जि. चंद्रपूर) – औद्योगिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या घुग्घुस शहरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. विजेअभावी वाढलेल्या उष्णतेत रात्री झोपणे अशक्य होऊन बसले होते. विशेषतः रात्रीच्या वेळेस महावितरण कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने आणि संपर्कासाठी कुठलाही हेल्पलाईन क्रमांक नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या समस्येला वाचा फोडत काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाचा घेराव केला. त्यांनी कार्यकारी अभियंता भटारकर यांच्याकडे रात्रपाळीमध्ये कर्मचारी उपलब्ध ठेवणे आणि नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याची मागणी केली.

काँग्रेसच्या या ठाम मागणीला महावितरणने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता रात्रीच्या वेळी दोन कर्मचारी नियमितपणे ड्युटीवर असणार आहेत. तसेच, नागरिकांसाठी 7875712376 हा हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे.

या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी सांगितले की, “घुग्घुसकर नागरिकांची रात्रीची गैरसोय लक्षात घेता आम्ही हे पाऊल उचलले. महावितरणने तात्काळ पावले उचलून हा हेल्पलाईन नंबर सुरू केल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी मदतीसाठी तात्काळ संपर्क करता येईल.”

राजुरेड्डी यांनी सर्व घुग्घुसवासीयांना हा नंबर सेव करून ठेवण्याचे आवाहन करताना सांगितले की, “हा क्रमांक नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महावितरणशी थेट संपर्क साधता येणार आहे.”

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, काँग्रेसच्या सक्रियतेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

संपर्कासाठी हेल्पलाईन: 7875712376
आपत्तीच्या वेळी वापरा, सुरक्षित रहा!

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News