चंद्रपुर – आज दिनकरराव कासनगोट्टुवार यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोर्गेवार यांनी त्यांची भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
डीडीआर पदावर कार्यरत असताना दिनकररावांनी प्रदीर्घ काळ जनतेसाठी निष्ठेने सेवा केली. त्यांच्या कार्यकाळातील सचोटी, निस्वार्थ वृत्ती आणि कार्यतत्परता ही आजच्या नव्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे.
आमदार जोर्गेवार यांनी यावेळी सांगितले की, “कासनगोट्टुवार सरांचा ९४ व्या वर्षात प्रवेश हा केवळ वयोमानाचा टप्पा नाही, तर एका तेजस्वी युगाचा साक्षात्कार आहे. त्यांची साधी जीवनशैली, माणुसकीवर आधारित मूल्यसंस्था आणि सच्च्या सेवेची भावना ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी श्री महाकाली चरणी प्रार्थना करण्यात आली.
कासनगोट्टुवार यांचा अनुभव म्हणजे काळाच्या प्रवाहातील अमोल ठेवा असून समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन त्यांच्याकडून आजही मिळते, असेही जोर्गेवार यांनी नमूद केले.




