Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

राजुरेड्डी यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून उत्साहात साजरा

घुग्घुस : शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध समाजसेवक जलसेवक राजुरेड्डी यांचा वाढदिवस २९ मार्च २०२५ रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील नवदिशा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिनाभराचे संपूर्ण अन्नधान्य भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच, त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यासोबतच चिमुकल्यांसोबतही केक कापून त्यांना विविध प्रकारची खेळणी, बिस्कीट, चॉकलेट, कोल्डड्रिंक्स आणि अन्य खाद्यपदार्थ भेट देण्यात आले.

या कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी शालिनी भगत, जिल्हा महिला उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, निलिमा वाघमारे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, मोसीम शेख, रोहित डाकूर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेखर तंगडपल्ली, विजय माटला, नुरूल सिद्दीकी, सुनील पाटील, थॉमस अर्नाकोडा, अरविंद चहांदे, शहशाह शेख, अभिषेक सपडी, साहिल आवळे, अजय त्रिवेणी, आयुश आवळे, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या सेवा उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News