Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जागतिक महिला दिनाचे औचित्य; जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पाणी व स्वच्छतेसाठी झटणाऱ्या महिलांचा सन्मान

चंद्रपूर : जिल्ह्यात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, उमेद अभियान, ग्राम पंचायत विभाग आणि ग्रामस्वराज्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी या स्तुत्य उपक्रमाची माहिती दिली.

ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रम
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘वॉश रन’ (स्वच्छतेसाठी धाव) हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिला, स्वयं-सहाय्यता बचत गट, किशोरवयीन मुली, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येईल. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भातील जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे.

तसेच, ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन पाणी व स्वच्छतेच्या अंमलबजावणीतील अडचणींवर चर्चा करण्यात येईल. याशिवाय, महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायत मॉडेल उभारणीचा संकल्प केला जाईल.

महिला सन्मान सोहळा व विशेष कार्यशाळा
तालुका स्तरावर विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान केला जाईल. यामध्ये –

स्वच्छता कामगार महिला

स्वच्छतेच्या मालमत्तेचे देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या महिला

किशोरवयीन चॅम्पियन

पाणी गुणवत्ता तपासणी व सर्वेक्षण करणाऱ्या महिला

यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यासोबतच, महिला आरोग्य अधिकाऱ्यांचे आरोग्याविषयी मार्गदर्शन तसेच मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन होईल.

संस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती उपक्रम
शाळा व महाविद्यालयांच्या सहकार्याने स्थानिक महिला नेतृत्वासोबत गट चर्चा आणि कथाकथन सत्रे आयोजित केली जातील.

पथनाट्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महिलांच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.

एफटीके किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्ता चाचणी व स्वच्छता व्यवस्थापनावर नवोन्मेषी प्रशिक्षण सत्रे घेतली जातील.

उमेद अभियानाच्या मदतीने स्वयं-सहाय्यता बचत गटांच्या नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण प्रदर्शन व मेळावे आयोजित केले जातील.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे मत
जिल्ह्यातील महिलांनी जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे महिलांच्या योगदानाची दखल घेण्यासह, पाणी व स्वच्छता व्यवस्थापनामध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी होणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News