सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ तारकर्ली येथे समुद्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असून, पर्यटनासाठी तारकर्लीला आले होते.
ही दुर्घटना आज (शनिवार) सकाळी एमटीडीसी रिसॉर्टजवळच्या समुद्रात घडली. समुद्राच्या लाटांमध्ये ओढले गेल्याने तिघे बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर एकाला तातडीने वाचवून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे तारकर्ली समुद्रकिनारी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात उतरताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




