Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नागपूर मेट्रोचा ११ वा वर्धापन दिन: एक दशकाचा यशस्वी प्रवास

नागपूर : नागपूर मेट्रोने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. महा मेट्रो नागपूरचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, तर २०१५ पासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली.

गेल्या दहा वर्षांत नागपूर मेट्रोने अपार यश संपादन केले. फेज-१ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, फेज-२ च्या निर्माण कार्याला गती मिळाली आहे. नागपूर मेट्रोने केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली आहे. वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्ट हा जगातील मेट्रो वर्गातील सर्वात लांब डबल डेकर असल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

नागपूर मेट्रोच्या यशाचा गौरव इतर राज्यांमध्येही होत आहे. फेज-२ प्रकल्पाचा शिलान्यास झाल्यानंतर या नवीन टप्प्यात नागपूर मेट्रोने आणखी वेगाने वाटचाल सुरू केली आहे. हा प्रकल्प ४३.८ किमी लांबीचा असून, यामध्ये ३२ नवीन मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. नागपूरकरांच्या सहकार्यामुळे प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून, नागपूर मेट्रो ही खर्‍या अर्थाने ‘माझी मेट्रो’ ठरत आहे.

नागपूर मेट्रोच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त महा मेट्रोच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक प्रवासात योगदान दिलेल्या नागपूरकरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News