Thursday, September 24, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सावित्रीबाई फुले शाळेच्या २० विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील २० विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या यशासह मनपा शाळेने शहरातील इतर शाळांच्या तुलनेत सर्वाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्र ठरवण्याचा मान मिळवला आहे.

एनएमएमएस परीक्षा ही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, नवी दिल्लीद्वारे घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठवी ते बारावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी प्रत्येकी १२,००० रुपये वार्षिक प्रमाणे चार वर्षांसाठी ४८,००० रुपये मिळत होते, परंतु यावर्षी एका वर्षाची वाढ होऊन एकूण ६०,००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

यंदा शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेतही वाढ करण्यात आली असून, पूर्वी दीड लाख रुपये असलेली मर्यादा आता ३.५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे, त्यामुळे अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का भालेराव, गणेश ठाकरे, संस्कृती घोटेकर, वैष्णवी कंदीकुरवार, शौर्य आंबटकर, रिंषा मुजुमदार, प्रशिल रामटेके, भूमिका निखाडे, सोहम सोरते, कैसीकौर भोयर, गौरव नंदनवार, माही निमगडे, श्रेयस दुर्योधन, रचना शंभरकर, समीक्ष गोदरवार, रोजीना सिद्दीकी, लुकेश जेंगठे, आरुषी देवघरे, प्रज्वल वैरागडे, वंश पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामुळे सावित्रीबाई फुले शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत शहरात आपला विशेष ठसा उमटवला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News