Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आयकर मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवण्याचा धाडसी निर्णय

नागपूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेत आयकराची मर्यादा 12 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. हा निर्णय देशाच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

‘अमृतकाल : विकसित भारत – 2047’ गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

नागपुरातील सायंटिफिक सोसायटी लॉन, लक्ष्मीनगर येथे मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित ‘अमृतकाल : विकसित भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व स्टॉक मार्केट गुरू विजय केडिया, एनएसईचे चिफ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीराम कृष्णन, मनी बीच्या संचालक शिवानी दाणी व मॅनेजिंग डायरेक्टर आशुतोष वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या संमेलनात भारताच्या 2047 पर्यंतच्या आर्थिक विकासाच्या दिशेने विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News