Tuesday, June 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सुरजागड लोहखनिज उत्खनन विस्तारासाठी जनसुनावणी, स्थानिकांचा पाठिंबा

गडचिरोली: गडचिरोली येथील नियोजन भवनाच्या सभागृहात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खनन १० दशलक्ष टनांवरून ६० दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यासाठी तसेच हेडरी, बांडे व पुरसलगोंदी येथे नवे लोहप्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली.

औद्योगिक विकासाद्वारे बेरोजगारी दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लॉयड्सच्या प्रकल्प विस्ताराला समर्थन देत मुलभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली.

उपस्थित मान्यवरांची उपस्थिती आणि चर्चा
या जनसुनावणीला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, खासदार नमदेव कर्सन, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव व उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांनी प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत सविस्तर चर्चा केली.

स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद
लॉयड्सच्या अधिकाऱ्यांनी खाण परिसरात शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत सुविधांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सुरजागड व इतर परिसरातील गावकऱ्यांनी कंपनीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत, प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

स्थानिक पातळीवर औद्योगिक विकासामुळे रोजगारनिर्मिती होण्याची मोठी संधी असून, हा प्रकल्प परिसरातील सामाजिक-आर्थिक विकासाला गती देईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News