पालघर : जिल्ह्यात थंडीमुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे, आणि पाणथळ भागांमध्ये विविध देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. विशेषतः खाडी भागांमध्ये स्पॉटबिल्ड डक म्हणजेच हळदीकुंकू बदकांचे थवे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
हिवाळ्यातील या दृश्यामुळे पक्षीप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी पालघर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्थानिक पर्यावरण प्रेमींनी या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी खाडी भागात भेट देण्याचा सल्ला दिला आहे, मात्र पर्यावरणाचा समतोल राखत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
थंड हवामान आणि या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन हे निसर्गप्रेमींना अनुभवण्यासाठी एक अनोखा योगायोग ठरतोय.




