चंद्रपुर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोर्गेवार यांनी कार्यालयीन जनसंपर्काच्या दरम्यान विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांची भेट घेतली. या शिष्टमंडळांमध्ये शेतकरी, कामगार, युवक, व्यापारी संघटना आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या, मागण्या आणि प्रलंबित प्रकरणे सविस्तरपणे मांडली.
यावर चर्चा करताना आमदार जोर्गेवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आणि प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत राहण्याची आणि लोकहितासाठी नेहमी तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
ही बैठक नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.




