चंद्रपूर : येथे बेलदार समाजाच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहात किशोर जोर्गेवार यान्ना भेट दिली. या भेटीत, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सा. कन्नमवार यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर केलेल्या ८ लाख रुपयांच्या निधीबद्दल सन्मान व्यक्त करण्यात आला.
स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. काम पूर्ण झाल्यानंतर हा परिसर चंद्रपूरच्या ओळखीत एक महत्त्वाचा मानबिंदू ठरेल आणि स्वर्गीय कन्नमवार यांच्या स्मृतींना आदरांजली ठरेल.




