Wednesday, May 6, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वाई प्रकल्पांतर्गत मच्छिमार संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील मौजा वाई येथील वाई लघु प्रकल्प पाटबंधारे तलावाचे मासेमारी हक्क पाटबंधारे विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत केले आहे. या तलावाच्या जलक्षेत्राकरीता मच्छिमार, प्रकल्पग्रस्त तसेच महिला मच्छिमार संस्था नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेय

भूजलाशयीन प्राथमिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीसाठी सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजित संस्थेमध्ये निर्धारित तलाव, जलाशयाच्या बाधित गावातील तसेच १० कि.मी. परिघाच्या परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त, महिला, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती यांचा समावेश करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

सदर प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), यवतमाळ यांच्या कार्यालय लोहारा एमआयडीसी येथील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी येथे संपर्क साधून ३० दिवसाच्या कालावधीत वाई लघु प्रकल्प पाटबंधारे तलाव सरासरी जलक्षेत्र १६० हेक्टर करीता संस्था नोंदणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसायच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News