Friday, July 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शस्त्र परवानाधारकांना शस्त्र नुतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी : जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांची शस्त्र परवान्यांची मुदत 31 डिसेंबर, 2024 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नुतणीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत कार्यालयीन वेळेत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

शस्त्र परवाना नुतणीकरणाकरीता फॉर्म अ-3 (Form A-3) (अर्जावर फोटोसह) परिपूर्ण माहितीसह सादर करावा. शस्त्र वापरणेस शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्यास S-3 नमुन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र, सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड परवाना अर्जासोबत जोडावा, परवाना नुतणीकरण पाच वर्षाकरीता फी रुपये दोन हजार पाचशे शासन जमा करणे आवश्यक आहे. सदर परवान्यास नुतणीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी प्रमाणे रूपये पाचशे दंड आकारण्यात येईल. तसेच शस्त्र परवाना नुतणीकरण करणेस विलंब झाल्यास सबळ पुरावा सादर करणे आवश्यक आहे. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला फॉर्म अ-3 (Form A-3) जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News