Friday, July 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

‘बसपा’चा निळा झेंडा यंदा विधानसभेत झळकणार : डॉ.हुलगेश चलवादी

मायावतीजींची पुण्यात ‘महासभा’!

शोषित, पीडित, उपेक्षितांना यंदा कायदेमंडळात नेतृत्व मिळेल

पुणे : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मान्यवर कांशीराम आयुष्यभर झटले. बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा राजकीय प्रतिनिधी बसपाच्या माध्यमातून कायदेमंडळात पोहचेल, असा विश्वास बसपचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.६) व्यक्त केला.

देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशचे कणखर नेतृत्व, यशस्वी माजी मुख्यमंत्री मायावती येत्या १७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील येरवडा येथे महासभेला संबोधित करणार आहेत. दुपारी १२ वाजता येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय मैदान, कॉमर झोन येथे आयोजित या सभेसाठी समाजातील अनेक बुद्धिवंत, विचारवंत आणि समाजसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. राज्यात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाचे आंदोलन बरेच गाजले. उपेक्षितांना विकासाच्या पुढील पंगतीत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बसपाचे आरक्षणाला समर्थन आहे. राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर बसपा योग्य मार्ग काढू शकतो. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची नुकतीच भेट घेत त्यांना देखील बहनजींच्या सभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News