चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत महापौर व उपमहापौर पदांसाठीची निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी तर प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
ही निवडणूक प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवड जाहीर होताच सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, नगरसचिव नरेंद्र बोबाटे, शहर अभियंता रविंद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.




