Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नागपूर, कामठी व पुलगाव येथील लष्करी आस्थापनांची ले. जन. डी.एस. कुशवाह यांची पाहणी

महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह यांनी 20 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत नागपूर, कामठी आणि पुलगाव येथील महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांना भेट देऊन पाहणी केली.

उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्र (यूएम अँड जीएस) च्या दौऱ्यादरम्यान 20 जानेवारी रोजी लेफ्टनंट जनरल कुशवाह यांना उपक्षेत्रातील युद्धकालीन तसेच शांततेच्या काळातील सज्जतेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये मानवतावादी सहाय्य व आपत्ती निवारण मोहिमा, माजी सैनिकांसाठीचे कल्याणकारी उपक्रम, सीताबर्डी किल्ल्यावर आयोजित सामान्य नागरिकांच्या सहली तसेच इतर सुरू असलेल्या उपक्रमांचा समावेश होता.

या भेटीदरम्यान लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह यांनी “लष्करी-नागरी एकात्मता” परिषदेला अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेत शासकीय विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत समन्वय व सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. याशिवाय त्यांनी जेएसआर डायनॅमिक्सच्या सुविधा व कार्यप्रणालीची माहिती घेण्यासाठी तेथे भेट दिली.

21 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पुलगाव लष्करी तळाला भेट देऊन केंद्रीय दारुगोळा डेपोतील प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान तसेच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत माहिती घेतली.

यानंतर गुरुवारी लेफ्टनंट जनरल कुशवाह यांनी कामठी येथील गार्ड रेजिमेंटल सेंटर (GRC), आर्मी पोस्टल सर्व्हिस विंग, आर्मी पब्लिक स्कूल तसेच विविध लष्करी युनिट्सना भेट दिली. गार्ड रेजिमेंटल सेंटरमध्ये त्यांनी अग्निवीरांसाठी राबविण्यात येणाऱ्या आधुनिक व नवोन्मेषी प्रशिक्षण पद्धती आणि सुविधांचे निरीक्षण केले. अग्निवीरांसाठीच्या प्रशिक्षणातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

तसेच आर्मी पब्लिक स्कूलच्या विकासासाठी आणि सैनिक, त्यांचे कुटुंबीय व माजी सैनिकांच्या कल्याणासाठी उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्राकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली.

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्राचे (यूएम अँड जी सब एरिया) जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल एन.एस. सोहल हे लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह यांच्यासोबत उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News