चंद्रपूर : मोहर्रमनिमित्त 5 व 6 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दिन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या दर्ग्यावर उर्स (यात्रा) आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेसाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 6 जुलै रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
ही मार्ग राहणार पूर्णत: बंद:
अंचलेश्वर गेट – छत्रपती शिवाजी महाराज चौक – गिरणार चौक
सोमेश्वर मंदिर – गिरणार चौक
सजंय लस्सी सेटर (एस.बी.आय. बँक) – गिरणार चौक
वरील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतील तसेच हे मार्ग नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
या पर्यायी मार्गांचा वापर करावा:
अंचलेश्वर गेट – कोहिनूर तलाव – मिलन चौक – गांधी चौक
सोमेश्वर मंदिर – मिलन चौक – गांधी चौक
एस.बी.आय. बँक (सजंय लस्सी सेटर) – गोल बाजार – गांधी चौक
एस.बी.आय. बँक (सजंय लस्सी सेटर) – कुबेर दवाखाना – अंचलेश्वर गेट
ही वाहतूक व्यवस्था 6 जुलै सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहणार असून, वेळेत बदल होण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय शहरात येणे टाळावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.





