Tuesday, June 9, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

यावल वनविभागाच्या कॉफी टेबल बुकचे भव्य प्रकाशन

यावल : यावल वनविभागाने आपल्या कार्याची झलक दर्शवणारी विशेष “कॉफी टेबल बुक” आज दिमाखात प्रकाशित केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तकाद्वारे यावल वनविभागाच्या विविध उपक्रमांचे, जैवविविधतेचे आणि संवर्धनाच्या कार्याचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुस्तकाच्या प्रकाशनावेळी विभागाच्या कार्याचा गौरव करत, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

खासदार स्मिता वाघ यांनी यावल वनविभागाच्या योगदानाला सलाम करत, जनतेपर्यंत पर्यावरणाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाला वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कॉफी टेबल बुक” ही यावल वनविभागाच्या कार्याची प्रेरणादायी कथा सांगणारी एक महत्त्वपूर्ण निर्मिती ठरली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News