मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सुरक्षा आढावा बैठक सुरू असून या बैठकीत राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त तसेच गृह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
या बैठकीत मंत्रालयाच्या सुरक्षेची सध्याची स्थिती, भविष्यातील धोके, आणि सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट करण्यासाठीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सध्या मंत्रालयाची सुरक्षा एक महत्त्वाचा विषय आहे, आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे.




