Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

22 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

नागपूर : जिल्ह्यातील प्रसिद्ध रामटेक येथे 22 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नेहरू मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार बारवे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या तीन दिवसांच्या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, रामटेकचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लोकांसमोर आणण्याचा उद्देश आहे. महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय स्तरावरील कलाकारही आपली कला सादर करतील.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News