Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू

मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, त्याचे अनावरण एप्रिल 2026 पर्यंत करण्याचा सरकारचा मानस आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला आणि त्यास जागतिक दर्जाचे करण्याच्या सूचना दिल्या.

स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मंत्री शिरसाट यांनी स्मारकाच्या उभारणीदरम्यान करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, तीव्र वादळ व नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणाच्या उपाययोजना यांची तपशीलवार माहिती घेतली.

या पाहणी दरम्यान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्मारकाचे काम दर्जेदार होण्यासाठी सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे, असे मंत्री शिरसाट यांनी नमूद केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News