Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्ह्यात शुक्रवारी पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात संतोषसिंह चंदनसिंह रावत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुधीर महादेव टोंगे (अपक्ष), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात निरंक आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

तर 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 22 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 10 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News